Ad will apear here
Next
धायरीत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद


पुणे :
धायरीतील श्रीराम वसाहत मित्रमंडळाच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचा २०० जणांनी लाभ घेतला, तर रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष सुनील शेळके यांनी ही माहिती दिली. 

धायरीतील सिल्व्हर बर्च हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरादरम्यान रक्तदाब, ईसीजी, मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात आला. 

या उपक्रमात मंडळाचे राजेंद्र मारणे (संस्थापक सचिव), राजेंद्र ओझरकर (संस्थापक खजिनदार), कैलास पजगाडे (संस्थापक कार्याध्यक्ष), विक्रम शेळके आणि कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. 

श्रीराम वसाहत मित्रमंडळाच्या वतीने दर वर्षी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा गणेशोत्सवासाठी येणारा इतर खर्च टाळून जमा झालेल्या लोकवर्गणीतून कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, तसेच पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZVFCE
Similar Posts
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर कुसगाव : श्रीमती काशीबाई नवले सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले यांच्या हस्ते झाले.
फुलवडे गावात मोफत आरोग्य शिबिर आंबेगाव : पावसाळ्यात आदिवासी भागात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. या पार्श्वभूमीवर फुलवडे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘नीमा वुमन्स फोरम’ची पिंपरी-चिंचवड शाखा आणि किसान सभा, आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने आठ सप्टेंबर रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते
गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन गणेशोत्सवातील देखावा आणि डीजे साउंड अशा गोष्टींवर अवाजवी खर्च न करता वाघोली येथील जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ यांनी एकत्र येत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language